न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- बालाजी इंड्रस्ट्रीयल इलेक्ट्रीकल या कंपनीच्या गोडावुनच्या बाजुला असलेल्या मोकळया जागेतील एम. एस. धातुचे सस्पेंडर मटेरियलचे १२ नग अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहेत. ज्याची किंमत साठ हजार रुपये आहे.
हि घटना (दि. ३०/०१/२०२३) रोजी सायं ७.३० वाजताचे सुमारास ते (दि.३१/०१/२०२३) रोजी सकाळी ९.०० वाजताच्या दरम्यान. गट नं.११९१, सोनवणे वस्ती रोड, दुर्गानगर, चिखली येथे घडली.
फिर्यादी संतोष बब्रूवान खोत (वय ४१ वर्षे, धंदा. नोकरी, रा. सत्यनारायण हौसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) यांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात ७० / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















