न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष, महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची यादी विस्तारित केली आहे. त्यात एकनाथ पवार यांच्या नावाचाही समावेश आहे.















