- कासारवाडीतील घटना; गुरुदेव मल्टी सर्व्हिसेसवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मासिक १० टक्के आकर्षक जास्तीचा परतावा देण्याचे आमिष आरोपीने फिर्यादीला दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीच्या गुरुदेव मल्टी सर्व्हिसेस फर्ममध्ये १६,६०,००० रूपये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, आजपर्यंत ४,००,००० रूपये मुळ रक्कम परत करून इतर कोणताही जास्तीचा नफा/रिटर्नस / परतावा / बोनस / फायदा न देता मुळ रक्कमेतील १२,६०,००० रूपये रक्कम स्वताःच्या फायदयाकरीता वापरून फिर्यादीची फसवणुक केली. तसेच इतर चार जणांची मिळूण २३,२५,००० रूपये रोख रक्कमची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७/०३/२०२१ ते आजपर्यंत) फिर्यादीच्या राहत्या घरी, केशवनगर, कासारवाडी येथे घडला.
फिर्यादी अफरोज मेहबुब शेख (वय ३६ वर्ष, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. सर्वे क्र ४६/२, मिळकत क्र १०५६, केशवनगर, कासारवाडी) यांनी आरोपी संतोष जयसींग पवार (गुरुदेव मल्टी सव्हिसेस फर्म, वय ४५ वर्ष, रा. लोहगाव, पुणे, मो.नं. ८९९९९५८४७१), महिला आरोपी (वय ३५ वर्ष राहणार सदर) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींविरोधात १२०/२०२३, भा.दं.वि. कलम ४०६,४०९, ४२० भादवि सह कलम ३ एमपीआयडी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.












