- चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुक रद्द होऊ शकते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- राज्याचे राजकारण सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीरुन तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अशातच घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीसंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले की ” चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेने संदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल. विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही ”
कारण आताची ही पोटनिवडणूक १४ व्या विधानसभेसाठी होणार आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल. त्यामुळे मग या निवडणुकांना काहीच अर्थ उरत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकींचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.















