न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- भोसरी विधानसभेत शहर मनसेच्या वतीने ८ मार्च रोजी ‘मनसे आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहर मनसेच्या वतीने गेली ५ दिवस भोसरी विधानसभेत तळ ठोकून मनसैनिक, जेष्ठ नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व भोसरी विधानसभेतील मंडळे, सर्व कार्यकर्ते व महत्वाच्या अशा एक हजार व्यक्तींच्या यादरम्यान भेटी-गाठी घेण्यात आल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, मनसे शहर अध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हेमंत डांगे, उपशहर अध्यक्ष बाळा दानवले, राजु साळवे, विभाग अध्यक्ष राहुल जाधव, विशाल मानकरी, संजय यादव, मयुर चिंचवडे, सचिव रुपेश पटेकर, महिला सेना अध्यक्ष अश्विनी बांगर, महिला सचिव, सिमाताई बेलापुरकर, स्नेहलताई बांगर, गायकवाड ताई, प्राजक्ता गुजर, अनिता पांचाळ, सचिन मिरपगार, सुशांत साळवी, सूरज जाधव, पै. रविशेठ जाधव, नारायण पठारे व मोठ्या प्रमाणात मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी भोसरी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मनसे या पक्षाविषयी माहिती दिली व घरातील सर्व माता-बहीणींची विचारपुस केली. तसेच प्रत्येक मंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांचीही भेट घेण्यात आली. शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध सामाजिक संघटनांची भेट घेऊन, त्यांना मनसेच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच त्यांच्यासमोर आगामी निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या ध्येय-धोरणांचा उलगडा देखील कऱण्यात आला, असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले आहे.











