न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- दापोडी येथील इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नगरसेविका व माजी स्थायी समिती सभापती सीमा साळवे यांचा स्मृतिचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थींनी झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, फातीमा शेख, सानिया मिर्झा, पी. टी. उषा, कल्पना चावला, किरण बेदी, इंदिरा गांधी आदी व्यक्तिरेखा साकारून मान्यवरांची मने जिंकली. तसेच बहू भी किसी की बेटी थी, हे अत्यंत सुंदर नाटक ऐमन पटेल, अकसा सैफी, हुजेफा शेख, तायबा यांनी सादर केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मर्दाना शेख, सह शिक्षिका सबानाज शेख, अश्विनी स्वामी, हवाईन शेख, विशाल वाळूंजकर, आमिर शेख काशिसाहब, वकार साहब, तेलीचरीसर, कालीचरन पाटोळे सर, मौलाना मुर्जीबर रहेमान, सुदर्शन चोरणे सर, माझीद अत्तार सय्यद, कुरशीद गणी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे सचिव सलीम शेख यांनी केले व आपल्या सर्व पाहुण्यांचे तसेच सर्व शिक्षकांचे आपल्या खास शैलीत आभार प्रर्दशनाचे काम शाळेचे अध्यक्ष उमेर गाझी यांनी केले व कार्यक्रमाचा समारोप झाला.











