न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- संत निरंकारी मिशन च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (दि. २६) रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन ’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
याअंतर्गत ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे. ही परियोजना संपूर्ण भारतात जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात येणार आहे. निरंकारी मिशनचे सुमारे १.५ लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील. तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील.
जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना नदी,कुकडी नदी, मीना नदी,वेळू नदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी होणार आहेत.















