न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयास पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव, संचालक अमित बच्छाव यांनी पुणेरी पगडी, उपरणे आणि दगडूशेठ गणपतीची प्रतीकृती असलेले गणेश मंदिर व पुष्पगुच्छ देऊन देशमुख यांचा यथोच्छित सत्कार सन्मान केला.
विजयसिंह देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “शिवाजीराजे शाळा ही खऱ्या अर्थाने एक आदर्श शाळा आहे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान वाढीसाठी शाळेतील सायन्स पार्क सेंटर मधील आगळ्या-वेगळ्या गणित, भूगोल, इंग्रजी व विविध प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो. शाळेतील शिस्तीबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले. देशसेवेसाठी तरुणांची फार मोठी फौज ही शाळा निर्माण करीत असल्याबद्दल सर्व शिक्षक आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी संस्थेस शुभेच्छा दिल्या.”











