न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राज्य सरकारने पिंपरी चिंचवड व जिल्हातील नेत्यांवर पदांचा वर्षाव केला आहे. शिवसनेने पिंपरी चिंचवड मनपा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
तर जिल्ह्यातून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे अत्यंत विश्वासू शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
याप्रसंगी दूरसंचार (बीएसएनएल) सल्लगार समितीचे सदस्य दत्तात्रय भालेराव यांनी नुकतीच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नवनिर्वाचित सदस्य राम गावडे यांची भेट घेतली व त्यांचा निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.











