न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची सुरुवात आज रविवारी (दि. १७) संपन्न झाली यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, हे माझं पहिलं भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा.
पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. बारामतीचा विकास शरद पवार साहेब, अजितदादांनी केलायं. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभा मतदार संघाचा विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादा, पवारसाहेबांचा पाठींबा मला सदैव असणार आहे. त्याकरीता शहरवासियांनी संपूर्ण पाठींबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.











