न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९) :- पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे आज मंगळवार (दि. १९) रोजी भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष होता. १९५२ साली ज्या निवडणुका झाल्या. त्यावेळी काँग्रेसला पर्यायच नव्हता. त्यामुळे अनेक वेळा पर्याय नाही म्हणून लोकं काँग्रेसला निवडून देत होते. नंतरच्या काळात छोटे-छोटे पक्ष एकत्र यायचे आणि काँग्रेसच्या विरोधात लढायचे.
देशात दोन हजार ४० राजकीय पक्ष देशात आहेत. तर, महाराष्ट्रात १९८ राजकीय पक्ष आहेत. नावानिशी एक पार्टी आहे. त्यापैकी भाजप-शिवसेना म्हटले की लोक ओळखतात. काँग्रेसचे विचारले की कुठला काँग्रेसच्या शरद पवार यांच्या काँग्रेसचा का? अजित पवार यांच्या काँग्रेसचा, पार्थच्या, परमार्थच्या की कुणाच्या काँग्रेसचा असा प्रश्न पडतो. कारण यांच्या प्रत्येकाच्या नावाने यांची पार्टी आहे.











