- युवा नेते मा. कुणाल थोपटे, मा. संजोग वाघेरे पाटील, मा. मयूर कलाटे यांचा उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा वाढदिवस गुरुवार (दि. २१) रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे साजरा होणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वतः पार्थ पवार सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष शहरात संजोग वाघेरे, नगरसेवक मयूर कलाटे आणि युवा नेते कुणाल थोपटे यांनी केले आहे.
सध्या पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात पार्थ पवार चर्चेत आहेत. मावळ लोकसभेची त्यांना उमेदवारी दिल्यापासून, पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाईमध्ये पार्थची वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे. पवार घराण्यातील उमदे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी पार्थशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पार्थ देखील अत्यंत साधेपणाने कार्यकर्त्यांमध्ये मिसळताना पहायला मिळतात.
त्यामुळे पार्थच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जनसागर लोटणार यात शंका नाही. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या भेटून शुभेच्छा देता याव्यात, यासाठी संजोग वाघेरे, मयूर कलाटे आणि कुणाल थोपटे यांनी पुढाकार घेत गुरुवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पार्थ पवार यांची वेळ घेतली असून, पार्थ पवार स्वतः या वेळेत रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे उपस्थित राहणार आहेत. सर्वांना पार्थला भेटता यावे आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी कार्यकर्ते आत्तापासूनच कार्यक्रमाच्या नियोजनाला लागले आहेत.
आपले युवा मित्र पार्थ अजित पवार हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारण्याकरीता दि .२१ मार्च २०१९ रोजी सायं. ४ ते ७ या वेळेत थोपटे लॉन्स, रामनगर, रहाटणी येथे उपस्थित रहाणार आहेत, तरी आपल्या युवा मित्रास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रहावे, ही विनंती.
– आपले विनीत : युवा नेते मा. कुणाल थोपटे व मित्र परिवार, मा. संजोग वाघेरे पाटील, मयूर कलाटे















