पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी निगडी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. ही पथके निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकातील पोलीस नाईक संदीप पाटील यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, हॉटेल वेदांत समोर एक इसम थांबला आहे. त्याच्याजवळ गावठी पिस्तुल आहे. या माहितीनुसार वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन वेदांत हॉटेल समोर चिखली पुणे रोडवर सापळा लावून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 45 हजार 200 रुपयांचा ऐवज मिळाला. यावरून ताब्यात घेतलेल्या इसमावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी तात्या तापकीर, संदीप पाटील, किशोर पढेर, विलास केकाण, आनंद चव्हाण, स्वामीनाथ जाधव, मच्छिंद्र घनवट व चेतन मुंढे यांच्या पथकाने केली.