न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने विविध विज्ञान संकल्पनांवर आधारित मनोरंजनात्मक व कृतिशील विज्ञान कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळी सुटीनिमित्त १६ एप्रिल ते ३० मे या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी सुटीच्या ४५ दिवसांच्या कालावधीत रोबोटिक्स, मनोरंजन, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रातील गमतीजमती, खगोल विज्ञानाची ओळख व दुर्बिणीतून आकाश दर्शन, जीवशास्त्र विविध विज्ञान प्रकल्प निर्मिती आदी विषयांवर कार्याशाळा होणार आहे.
या शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सायन्स पार्क भेट आणि थ्रीडी शो सुविधा, तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यशाळेत नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शक विविध प्रयोग करून घेणार आहेत. या शिबीरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून सायन्स पार्कचे शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा.















