न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध सेवा मंडळ, रस्टन कॉलनी आणि रस्टन औद्योगीक सह वसाहत मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानाने Dr Lal Pathlabs यांच्या संयोजनाने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नवले, संचालक सुभाष मालुसरे, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र (बाप्पू) वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
बौद्धाचार्य ईश्वर ठानांबिर यांनी वंदनेचा कार्यक्रम पार पडला. तसेच जयंतीचे व शिबिराचे आयोजन सुमित कांबळे, राजेंद्र धनवडे, अविनाश पवार, संतोष सौंदणकर, प्रशांत शेनॉय, गणेश ओगले, प्रणित खरात, सुमेध मोरे, नामदेव गवळी, सुधीर जौंजाळ, स्वप्निल मोरे, प्रशिक भोसले, रुपेश भोसले, तुषार आल्हाट, रोहन भोसले, कुणाल ओव्हाळ, निशांत कांबळे यांनी केले.















