न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालय व दवाखान्यांसाठी आवश्यक औषधांची १२ कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आली. मात्र, तो साठा अपुरा असल्याने आणखी ६ कोटी ३० लाख रुपयांची औषधे खरेदी करण्यात येणार आहे. त्या वाढीव खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
शहरात विविध ठिकाणी पालिकेचे रुग्णालय व दवाखाने आहेत. उपचारासाठी तेथे दररोज हजारो रुग्ण येतात. त्यांना मोफत औषधे दिली जातात. पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने पुण्यातील ओमनी हेल्थ केअर, मोशीतील केअर प्लस, रावेतमधील मेडिनिला हेल्थ केअर यांच्याकडून प्रत्येकी ६६ लाख ६६ हजार ६६६ खर्चाची औषधे खरेदी केली आहेत. ही दोन वर्षांसाठी आवश्यक औषधे आहेत. मध्यवर्ती भांडार विभागाची २ कोटीची खरेदीची मर्यादा संपली आहे. खरेदी केलेली जेनेरिक औषधे ८० टक्के कमी, ब्रँडेड औषधे ३४ टक्के कमी आणि सर्जिकल औषधे ६६.२० टक्के कमी दराचे आहेत.
मात्र, ही औषध खरेदी कमी पडत असल्याने प्रतिमाह ३५ लाख य प्रमाणे उर्वरित दीड वर्षांसाठी ६ कोटी ३० लाखांची औषधे खरेदी करण्यात येणार आहे. ही औषधे वरील पुरवठादारांकडून खरेदी केली जाणार आहेत. या वाढीव खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.


















