न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- देशाचा विकास व्हायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना बाजूला करण्याची गरज आहे. यापुढे मी जे जे काही करेन ते मोदींच्या विरोधात, तुम्हीही तेच करायचं आहे,” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नुकतेच केलं.
या आदेशाची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा मिरवला. त्यामुळे आगामी काळात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासोबत मनसेचे इंजिन देखील एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.















