न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- आपल्या आयुष्यात निरंतर शिक्षण घेणे ही यशाची गुरुकिल्ली आहे,.असे मत औद्योगिक अनुसंधान परिषदेचे सचिव शास्त्रज्ञ डॉ. गिरीश साहनी यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, डॉ. डी. वाय पाटील इन्स्टीटयुट ऑफ इंजिनिअरींग मॅनेजमेंट ॲंड रिसर्च, डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस अँड क्राफ्टस्, डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या पाच कॉलेजमध्ये पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माजी मंत्री सतेज पाटील, संकुलाचे संचालक कर्नल (नि.) एस्. के. जोशी, डी.वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन, प्राचार्य डॉ. विजय वढार्इ. प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे, प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, प्राचार्या डॉ. पंकजा बागुल, डॉ. संजय पांडे, सर्व महाविद्यालयांचे मुख्य परीक्षा अधिकारी तथा विदयार्थी प्रतिनीधी यावेळी मंचावर उपस्थित होते.

डॉ. सहानी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सर्व विद्यार्थ्यानी निरंतर शिक्षणाला व्यवसायिक तथा वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य अंग बनवून त्याद्वारे यशाचे शिखर गाठावे, असे आव्हान केले. त्यापुढे विद्यार्थ्यांनी आपआपल्या क्षेञामधील व्यावसायिक सेवे व्यतिरीक्त समाजसेवासुध्दा करावी कारण समाजसेवा केल्याने खरे समाधान मिळते, असेही त्यांनी नमुद केले.
यावेळी सर्व महाविदयालयामधील सुमारे 800 विद्यार्थ्यना सामुहिक पदवीप्रदान करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयामधील प्रथम व व्दितीय आलेल्या एकुण ३० विद्यार्थाचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा. हनी विल्यम्स व प्रा तृप्ती वाघ यांनी कार्यक्रमाचे सुृृञसंचालन केले व प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी आभार मानले.











