न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- थेरगाव, आकुर्डी, भोसरी आणि जिजामाता रुग्णालयांसाठी मानधनावर डॉक्टरांची फेर नेमणूक केली जाणार आहे. त्याचा कालावधी ११ महिन्यांचा आहे. त्यांना दरमहा २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
वैद्यकीय सुविधेसाठी पालिकेने थेरगाव, आकुर्डी, भोसरी व पिंपरी कॅम्पात जिजामाता ही नवीन चार रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. तसेच, सांगवी व यमुनानगर रुग्णालय सुरू आहे. पालिका आस्थापनेवर डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी नसल्याने मानधनावर डॉक्टर नेमण्यात येतात. मागे २० जून २०२२ ला जाहिरात प्रसिद्ध करून डॉक्टरांची मानधनावर नेमणूक करण्यात आली होती. त्या डॉक्टरांची मुदत १६ जुलै २०२३ ला संपत आहे. त्यांना सेवा खंडित करून पुन्हा ११ महिने कालावधीसाठी मानधनावर नेमण्यात येणार आहे.
त्यात अर्थोपेडीक, नेत्रतज्ज्ञ, न्युरोसर्जन, ह्रुदयरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, पॅथोलॉजिस्ट, सर्जरी आदी डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांची फेरनियुक्ती करण्यास तसेच, त्यांच्या मानधनाच्या एकूण खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
















