न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कंटेनर उलटल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली. कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि तातडीने कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यास आली. अवजड कंटेनर उलटल्यानंतर क्रेन मागविण्यात आली. क्रेनचावापर करून अवजड कंटेनर बाजूला काढण्यात आला.
















