- स्वी सदस्य दिनेश यादव यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- कुदळवाडी चिखली भागातील सर्व नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजुबाजुच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्याचप्रमाणे डास ,मच्छर, माशी याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू ,मलेरिया, ताप या आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेक लहान मुले आजारी पडत आहे. पावसाळ्याच्या पुर्वी सर्व ठिकठिकाणी पाहणी करुन ते स्वच्छ करण्यासाठी सुरुवात करावी.
दरम्यान नाल्यांचे खोलीकरण करुन संपुर्ण गाळ बाहेर काढावा. त्यामुळे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल. आजुबाजुच्या परिसरात बोर, विहीरी यांची पाणीपातळी वाढेल. सध्या पाणी जिरवण्यासाठी फक्त ओढे, नाले, नदी हीच ठिकाणी शिल्लक आहेत. त्यामुळे नालेसफाई प्रमाणे खोलीकरण देखील महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर नालेसफाई करावी अशी मागणी स्वी. सदस्य दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
















