- चिखलीत अल्पवयीन टोळीची दहशत; एकावर कोयत्याने हल्ला; वाहनांची तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- फुटपाथवर गप्पा मारताना आरोपी क्र. १ याने इथ का बसला? म्हणत फिर्यादीशी वाद घालून बाचाबाची केली. त्यांना लाथाबुक्यांनी मारत ” आता तुला मी कोण आहे ते दाखवतो, तुझा आता मर्डरच करतो बघ” अशी धमकी दिली. फिर्यादी व त्यांचा मित्र तिथून पळुन भंगाराच्या दुकानासमोर थांबले. त्यानंतर त्याच दिवशी फिर्यादीच्या मित्राच्या मोबाईलवर आरोपीचा कॉल आला. ” तु आणि पप्या मच्छी चौकात ये, तुम्हाला बघतोच असे म्हणत शिवीगाळी करत फोन कट केला. त्यानंतर रात्री १०.०० च्या सुमारास ते दुकानासमोर थांबले असताना तिथे आरोपी क्र. १ हा त्याच्यासोबत त्याचे मित्र आरोपी विधिसंघर्षित बालक २, ४, ५ यांना सोबत घेवुन आला. त्यातील आरोपी क्र १. विधिसंघर्षित बालक क्र २ व ३ यांच्या हातात कोयते होते. तिघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रावर धावून येत “आता तुमचा मर्डरच करतो” असे बोलून त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. तेव्हा विधिसंघर्षित बालक क्र ५ याने फिर्यादीस हाताने पकडयाचा प्रयत्न केला. विधिसंघर्षित बालक क्र २ याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो वार फिर्यादी यांनी हुकवला. तेव्हा फिर्यादी त्याच्या तावडीतुन हिसका मारून निसटुन रस्त्याने पळत सुटले. तेव्हा विधिसंघर्षित बालक क्र २ याने फिर्यादी यांना गाठुन पुन्हा कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार करत जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो वार पुन्हा हुकवला. आरोपी क्र १ व ३ यांनी देखिल त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यासोबत झटापट होऊन झालेल्या झटापटीमध्ये फिर्यादीच्या पाठिवर, हातावर व डोक्यावर कोयत्याचे वार लागुन जखमा झाल्या. तेव्हा फिर्यादी मर्डर करतील म्हणुन घाबरुन तेथून पळुन गेले. त्यानंतर फिर्यादी यांचा मित्र हा देखिल त्याचा जिव वाचवत तेथुन पळुन गेला. फिर्यादी यांना मारहाण करताना त्यांनी रस्त्यावरील दोन गाडया फोडुन गाडयांचे नुकसान केले आहे. तसेच “आम्ही इथले भाई आहे, आमच्या मध्ये कोणी आले तर मर्डर करुन टाकु” असे जोरजोरात ओरडले. आरोपींच्या दहशतीला घाबरुन रस्त्यावरील सर्व लोक घाबरुन तेथुन पळुन गेले. कोणीही फिर्यादी यांना वाचवण्यासाठी मधे पडले नाही.
त्यानंतर देखील फिर्यादिचा मित्र याच्या मोबाईलवर आरोपीचा वारंवार कॉल येत असुन ” तुम्ही दोघे कोठे आहे, तुमचा मर्डरच करणार आहे, दोन महिन्यांनी का होईना भेटशीलच ना, कव्हाबी भेट, जेव्हा भेटशील तेव्हाच तुमचा मर्डर फिक्स” अशी धमकी देत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ५) रोजी रात्री ८.०० वा. म्हेत्रे गार्डन समोरील फुटपाथवर चिखली आणि रात्री १०.०० वा. सोन्या कांबळे याच्या दुकानासमोर, मनपा शाळेसमोरील रोडवर, आंगणवाडी चौक, चिखली येथे घडली.
अल्पवयीन फिर्यादीने आरोपी १ निखिल पाटिल, २ विधिसंघर्षित बालक (वय १७ वर्षे), ३ मॉडेल ऊर्फ विशाल गंजे, ४ विधिसंघर्षित बालक, ५ विधिसंघर्षित बालक (वय १६ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ३०५/२०२३ भा.द.वि.क. ३०७, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४४, १४६, १४७, १४८, १४९, सह. आर्म अॅक्ट कलम ४,२५, सह मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७ (१)/१३५, सह. क्रिमिनल अमेन्टमेन्ट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी ३ व विधिसंघर्षित बालक क्र. २,४,५ यांना ताब्यात घेतले आहे.
















