न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर चौकात अशोक स्तंभ बसवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे AIMIM पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड शहराचे मध्यवर्ती व मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसृष्टी स्मारक देखील आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाचे कार्यक्रम हे सर्व भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक या ठिकाणीच होत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.
अशोकस्तंभ हे देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे. भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी अशोकस्तंभ हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न करून ते मंजूर करून घेतले. यामुळे डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर स्मारक समोरील पिंपरी चौक येथे अशोक स्तंभ बसवण्यात यावा. अशोकस्तंभ या ठिकाणी बसवल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. शहरवासियांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. यामुळे आपण लवकरात लवकर यावर कार्यवाही करून भारतरत्न डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक येथे अशोक स्तंभ बसवण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.