न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- चिखली परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन कोयत्याने दहशत माजविणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने घेतले ताब्यात आहे.
दरम्यान गुन्हयातील निष्पन्न सर्व आरोपी चिंचेचा मळा, चिखली येथे येणार असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान चारही आरोपी शेतात थांबलेले दिसुन आले. पोलिसांना पाहताच आरोपी पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विशाल ऊर्फ मॉडेल नंदू गांजे (वय २० वर्षे, रा. सध्या यशवंत कॉलनी, मोरे वस्ती, चिखली, मुळ रा. मु/पो भारंब, ता येवला, जि नाशिक), त्याचे तीन साथीदार यांना ताब्यात घेवुन त्यांना पुढील कारवाईसाठी चिखली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींवर चिखली पो.स्टे. गु. रजि.नं.३०५/२०२३ भादवि कलम ३०७,३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४४. १४६, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट कलम ४,२५ सह मपोका कलम ३७ (१), १३५ सह क्रिमिनल अमेंटमेंट अॅक्ट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार बाळु कोकाटे, फारुक मुल्ला, महादेव जावळे, गणेश महाडीक, प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारोती जायभाये, प्रमोद गर्जे, नागेश माळी यांनी केली आहे.
















