- सहायक आयुक्त प्रशांत जोशी कार्यमुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील विविध पदांवरील अधिकारी, कर्मचा-यांच्या बढतीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये एकूण ५८ जणांना विविध पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.
महापालिकेचा रखडलेला आकृतीबंध, भरती प्रक्रिया, पदोन्नती, निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे शेकडो पदे रिक्त आहेत. पदोन्नती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध पदांवर पदोन्नती देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यानुसार एकूण ५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदोन्नती देण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.
यामध्ये लेखापाल पदावर ६, उपलेखापाल १७, लिपिक १, उद्यान अधिक्षक ९, आरेखक २, विद्युत पर्यवेक्षक १०, मुख्य आरोग्य निरीक्षक २, कार्यकारी अभियंता (विद्युत) ४, उपअभियंता (स्थापत्य) ४. मेट्रन १ आणि सहायक मेट्रन १ अशा एकूण ५८ जणांना पदोन्नती देण्यात आली.
पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना संबधित विभागात व नेमून दिलेल्या पदावर रूजू होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे. तर, पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या पदांवर भरती प्रक्रियेनंतर कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.
सहायक आयुक्त प्रशांत जोशी कार्यमुक्त…
महापालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागातून आकाशचिन्ह व परवाना विभागाचे बदली झालेले सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांना सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (दि.१०) कार्यमुक्त केले आहे. जोशी यांची एका वर्षांसाठी पालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. जोशी यांनी पालिकेतून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना आयुक्तांनी कार्यमुक्त केले आहे. ते पुन्हा शासनाच्या महसुल व वन विभागात रूजू झाले आहेत.


















