न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- रुपीनगर येथील सरस्वती हौसींग सोसायटी, कोयना हौसिंग सोसायटी या परिसरामधील अंडरग्राऊंड केबल जळाल्यामुळे विदयुत प्रवाह बंद झालेला होता. त्या ठिकाणी केबल बसविण्याचे काम चालु होते.
दरम्यान परिसरामधील विदयुत प्रवाह खंडीत झालेला आहे, याचा राग धरुन आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन फिर्यादी हे काम करत असलेल्या गणेशनगर, तळवडे येथील कार्यालयामध्ये येवुन त्यांनी विदयुत प्रवाह खंडीत झाल्याबाबत फिर्यादी यांस शिवीगाळी करून दमदाटी केली आहे.
तसेच फिर्यादी हे सरकारी काम करीत असताना फिर्यादीच्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून त्यांना मारण्याची धमकी देवून कार्यालयामधील खुर्च्या तोडुन नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी ५.३० च्या सुमारास, सहाय्यक अभियंता कार्यालय, महावितरण, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, गणेशनगर, तळवडे येथील कार्यालयामध्ये घडला.
फिर्यादी राहुल एकनाथ इंगळे यांनी आरोपी वैभव जिरे, दत्ता राऊत, बिभिवान पोकळे, महिला आरोपी, नारायण जिरे, इतर दोन अनोळखी इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३११/२०२३ भादंवि कलम ३५३, १४३, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















