न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- व्हॉटसअॅप व्दारे आरोपीने फिर्यादीला लिंक पाठवली. ती लिंक ओपन करुन फिर्यादी यांना टेलीग्राम अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर फिर्यादी यांना अकाउंट ओपन करण्यास सांगुन विविध टास्क पाठवल्या.
त्या शिवाय क्रिप्टो करन्सी प्लटफॉर्मवर फिर्यादी यांना वेळोवेळी एकूण २८ लाख ८५ हजार पाठवण्यास सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १३/०२/२०२३ ते १४/०३/२०२३) पर्यंत बावधन येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी ८५०९५७८९७८,८१५९९९०९४६१, ७५०१३५३०९२,९०४६५९४८६९ अज्ञात मोबाईलधारक इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ६०४/२०२३ भा.द.वि कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.















