न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता आरोपीने दिलेल्या May3210 आयडी व May3210@ या पासवर्डचा वापर करुन T20 World Exchange.com या वेब साईटवर जावुन चालू क्रिकेट मॅचचा भाव पाहुन भारत सरकारने बंदी घातलेला क्रिकेट बेटींगचा व्यवसाय करून त्यातून बेकायदेशिरपणे आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी रात्री १०.५५ च्या सुमारास फ्लॅट नंबर ११. दुसरा मजला प्रित अपमेंट, साधु वासवानी गार्डन समोर, पिंपरी यातेह उघडकीस आला.
पिंपरी पोलिसांनी ५११/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ) व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) नुसार सनी प्रेमचंद गुरनानी (पिंपरी), सचिन सुदाम हासनदासानी (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















