न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- ‘ तु सोसायटीचे मेन्टनंन्स भरत नाही, तु सोसायटीच्या जीवावर जगतो, असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच तेथे असलेली झाडाची कुंडी पायावर फेकून मारली. जमिनीवर पडलेला दगड उचलुन फिर्यादीच्या दिशेने फेकला.
परंतु, तो फिर्यादीला लागला नाही. फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहान करुन अचानक खिश्यातुन टेस्टर काढुन फिर्यादीच्या नाकाच्या उजुव्या बाजुच्या नाकपुडीवर मारले. त्यामुळे फिर्यादीच्या कपाळातून रक्त येवु लागले. तसेच सह आरोपी हा फिर्यादीला शिवीगाळ करत बाजुला थांबला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १२) रोजी रात्री ११.३० च्या सुमारा निघोजे, मंत्रा रेसीडन्सी समोर ता. खेड जि.पुणे) येथे घडली. फिर्यादी भाऊसाहेब युवराज पवार (रा. निघोजे) यांनी आरोपी दत्तात्रय पवार, मंगेश साळुंखे, दिपक वरक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २६१/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.