न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६६ व्या जयंतीच्या पूर्व संध्येला बार्डव्हॅली उद्यानात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या शस्त्र प्रदर्शनाचे पूजन तुषार हिंगे, सागर तापकीर व संदीप थोरात यांच्या हस्ते फुल व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रदर्शनाला शहरातील शंभूप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला. सायंकाळी उशिरा बर्डव्हॅली उद्यानात अतिशय आनंदाच्या वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत स्मारकाच्या सर्व बाजूला शेकडो पंत्या लावून व मशालज्योत पेटवून शंभुप्रेमींच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी तुषार हिंगे, प्रफुल्ल पुराणिक, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे सागर तापकीर,अभिषेक म्हसे, जालिंदर खतकर, संदीप थोरात, विनायक जाधव, अमोल तोडकर, संतोष वाघे, गौरव गोसावी, गणेश मराठे, प्रशांत बाराथे, सोनाली हिंगे, सानिया तापकीर, राजेंद्र पाटील, योगीश गडवाणी, गणेश नांगरे, सुनील गुंजवटे, अमीत देशमुख, विक्रम जानगुडे, विकी पिंजरकर, पल्लवी थोरात, मनीषा पाटील, दिपाली शिंदे. यांच्यासह शहरातील शंभूप्रेमी उपस्थित होते.


















