न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- तळवडे येथे नव्याने सुरू होत असलेल्या हॉस्पीटलमध्ये मेडिकल व्यावसायिक भागीदारी देतो, असे आरोपीने फिर्यादीला आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादीकडून व इतर दोन ते तीन इसमांकडून व्यवसायीक भागीदारीच्या नावाखाली फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून १५,००,००० रुपये अमानत रक्कम घेवून स्वतःच्या फायद्याकरता वापरून फिर्यादीची अर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि २९/१२/२०२२ ते दि ०३/०४/२०२३) दरम्यान इंद्रायणीनगर, भासेरी येथे घडला.
फिर्यादी स्वप्निल पोपट भालेराव (रा. भोसरी) यांनी आरोपी डॉ. महेश काकडे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४२३/२०२३, भा.दं.वि. कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.