न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- जादा उत्पन्न मिळवुन देण्यासाठी वेगवेगळया प्रीपेड टास्कची माहिती आरोपीने फिर्यादीला दिली. त्यामधुन अधिकचे उत्पन्न मिळवुन देण्याचे आमीष दाखवले. फिर्यादीला वेगवेगळया बँक अकाऊंटमध्ये व यु.पी.आय.आय.डीमध्ये एकुण ३ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. परताव्यासहित ५ लाख ६० हजार रुपये देण्याचे आमिष दाखुन फिर्यादीचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २३ /०३/२०२३) रोजी पिंपळे सौदागर येथे राहत्या घरी घडली.
फिर्यादी श्रीपाद कृष्णाजी मुंगी (रा. स्वराज गार्डन समोर, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी अज्ञात मोबाईल नंबर ८१४१२२१८४६, @sal666sal वरील अज्ञात इसमाविरुध व टेलीग्राम आवडी @ Mmasuma212 च्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २१८ / २०२३, भा.दं.वि. कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.