न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- जुना मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिर ते काळोखे पेट्रोल पंप सोमाटणे फाटा या दरम्यान रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मंगळवारी (दि. १६) ते गुरुवारपर्यंत (दि. १८) दरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाणार होती. त्यासाठी या कालावधीत महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार होती. तसा आदेश पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे काढला होता. परंतु ही कारवाई आदेशान्वये अचानक रद्द करण्यात आली आहे.
महामार्गालगतचे अतिक्रमण काढताना वाहतूक नियमनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीत बदल केला जाणार होता.
हा बदल १६ ते १८ मे दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेसाठी होता. परंतु पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी पत्रकाद्वारे कारवाई आदेशान्वये रद्द केली आहे.
















