न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (अभामनाप) मध्यवर्ती मुंबईच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक व परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जागांसाठी निवडणूक आज १६ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातून पदाधिकारी निवड करायची असल्याने या निवडणुकीला कमालीचे महत्व आले आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले विरुध्द नवनाथ मच्छिंद्र कांबळी अशी लढत आहे. उपाध्यक्षपदासाठी दोन पदे असून एका पदासाठी नरेश सुमंतराव गाडेकर आणि अविनाश गोपाळ नारकर हे आमने सामने उभे ठाकले आहेत. दुसऱ्या उपाध्यक्षपदावर भाऊसाहेब भोईर यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
कोषाध्यक्ष पदासाठी वीणा अजित लोकुरे आणि सतीश किसनराव लोटके हे दोन उमेदवार आहेत. प्रमुख कार्यवाह पदासाठी जगन्नाथ नाथा चितळे आणि अजित गोपिनाथ भुरे, तर सहकार्यवाह पदाच्या तीन जागांसाठी सहा उमेदवारांत समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी-मोने, दिलीप कोरके, अजय दासरी, सुनिल ढगे आणि एश्वर्या नारकर रिंगणात आहेत. कार्यकारणी सदस्य पदाच्या ११ जागांसाठी १३ उमेदवारांमध्ये गिताबाली उनवणे, विजय चौगुले, संजय देसाई, गीतांजली ठाकरे, संदीप पाटील, गिरीश गौरीशंकर महाजन, सविता मालपेकर, संजय रहाटे, शंकर रेगे, सुशांत शेलार, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंके आणि दीपा क्षिरसागर हे उमेदवार आहेत.


















