न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- घरातील साहित्य संपल्याचे अगोदर सांगितले नाही, म्हणुन तेरा वर्षीय मुलीला आरोपी आईने राहत्या घरी लाकडी बांबु व लाकडी फळीच्या तुकडयाने मारहाण केली. त्यामध्ये तिच्या हाताला, पायाला, पाठीवर व डोक्याला मार लागला.
तसेच छातीवर हाताने व पायाने मारहाण केल्याने तिला गंभीर दुखापत झाली. त्यातच तिचा मृत्यु झाला. तसेच आरोपीने शासकिय रुग्णालयात व पोलीसांना मयत मुलीच्या मृत्युबाबत खोटी माहिती दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास थेरगांव येथे घडला. वाकड पोलिसांनी आरोपी आईवर ४७६/२०२३ भा.द.वि.क. ३०२,१८१ सह बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


















