न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- वाकडच्या मानकर चौकाजवळ स्मशानभुमीच्या शेजारी अंधारात पाचजण थांबले होते. आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच वाकड पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून लोखंडी कोयते, डीओ, अॅक्टीव्हा, मोपेड जप्त केली. पोलिसांनी ही कारवाई (दि. १५) रोजी रात्री १.३० च्या सुमारास केली. वाकड पोलिसांनी आरोपींवर ४७२/२०२३ भादविक ३९९, आर्म अॅक्ट ४,२५, महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद दयानंद कांबळे (रहाटणी), प्रफुल्ल राजु वाघमारे (थेरगाव), पवन महादेव जाधव (रहाटणी), रोहीत राहुल शिंदे (रहाटणी), राहुल कॅप्टन मोरे (पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.


















