न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- जनावरं कापण्यासाठी व विकण्यासाठी आरोपी जनावराला निर्दयतेने टेम्पोतून घेवुन जात होते. याप्रकरणी कॉलर यांनी पोलीसांना माहिती दिली. रावेत पोलीसांचे टु व्हिलर मोबाईल पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टेम्पोंची पाहणी केली. टेम्पोत गाय, गाईच्या खोडास व वासरास बांधले होते.
पोलिसांनी आरोपींना जनावरांसह रावेत पोलीस स्टेशन येथे आणले. त्यात २०,००० रुपये किंमतीची खिल्लारी गाय, २०,००० रुपये किंमतीची दोन खोंड, ५,००,००० रुपये किंमतीचा टाटा एस छोटाहत्ती असा एकुण ५,४०,००० रुपये किंमतीची जनावर जप्त केली. आरोपींनी ४०,००० रुपये देऊन जनावरं कापण्यासाठी खरेदी केले होते. गाई, गाईचे खोड व वासराची टेम्पोमधून बेकायदेशीर वाहतूक केली. त्यांना चिंचवड स्टेशन शेजारील मोकळया जागेत कापण्यासाठी आरोपी घेवुन जात होते, असे आरोपींपैकी एकाने पोलिसांना सांगितले.
हा प्रकार (दि. १४) रोजी बीआरटी रोड, गोल्डन जिमजवळ, रावेत येथे उघडकीस आला. रावेत पोलिसांनी २१७/२०२३, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ), ५(ब), ९ (ब), ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१), ११(१)अ. ११(१) एफ, ११(१) एच, ११(१) आय सह प्राण्यांचे परिवहन नियम ४७,५४,५६ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
अन्वर मुनेर सय्यद (रा नेरेगाव, दत्तवाडी, मुळशी), प्रकाश राज अमोलिक ( रा. सदर), बाळु राजाराम तुपे (रा. तुपे वस्ती रावेत) यांना पोलिसांनी अटक केली आहे.