न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- किरकोळ भांडणाच्या कारणावरुन आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या दाजीला शिवीगाळ केली. लोखंडी रॉड व दगड मारून त्यांना जखमी केले. हा प्रकार (दि. १४) रोजी सायं ५.०० च्या सुमारास तोरणा हॉटेलच्या मागील वाहनांच्या पार्किंगमध्ये, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी सिध्देश्वर बालाजी माळी (वाल्हेकरवाडी) यांनी आरोपी भिमराव वाघमारे, आदित्य वाघमारे, प्रभाकर शिंदे (रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी २२२/२०२३ भा.द.विकलम ३२४,३५२, ३२३, ५०४, ३४ महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३)सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.