न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्या स्मारकास शहिद दिनानिमित्त मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी शनिवार (दि. २३) रोजी भेट दिली. तसेच, पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयुर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विशाल वाकडकर, अपर्णा डोके तसेच अतूल शितोळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पार्थ पवार म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळेच आज आपण स्वातंत्रपणे जीवन जगत आहोत. क्रांतीकारकांनी चेतवलेली राष्ट्रभक्तीची ज्योत आपण त्यांच्या विचाररुपाने कायम तेवत ठेवली पाहिजे. त्यासाठी देशातील युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.















