न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे काॅंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी आघाडीचे उमेद्वार पार्थ पवार सध्या पिंपरी चिंचवड व मावळमध्ये प्रचारात आघाडीवर आहेत. त्यांचा प्रचार दौरा सध्या जोमात सुरु आहे.
यावेळी पार्थ यांनी पिंपळे सौदागर परिसरातील नाना काटे ज्येष्ठ नागरीक संघाच्या सत्कार सोहळ्यात हजेरी लावली. जेष्ठ नागरिक संघाचे रघुनाथ (आबा) काटे यांनी यावेळी पार्थ पवार यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, सामाजिक कार्यकर्ते सुनील काटे व ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य उपस्थित होते.











