न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं.
आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले तर वाहतूकही विस्कळीत झाली. नाशिक वरुन पुण्याला जाताना चाकणमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकात घटना घडल्याने परिसरात गर्दी जमा झाली.
शिवशाही बसच्या टायरला आग लागून बसने पेट घेतला. चाकण नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालं असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.














