न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच विधानसभा निवडणूक प्रमुखपदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने झालेली विकास कामे सर्व नागरिकांना कळावी. तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने पिंपरी विधानसभा संघटन भाजपाच्या कामांचा शुभारंभ कासारवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आला.
या नंतर परिसरातील बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या घरोघरी भेटीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक, माऊली थोरात, स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, प्रकाश जवळकर, सूनील लांडगे, गजानन मोरे,
गदिया सुरेश, देवदत्त लांडे, संतोष टोणगे, गणेश जवळकर, हर्षल भोसले, गणेश संभेराव, सुहास जाधव, बापूसाहेब भोसले, बाळासाहेब लांडे, युवराज लांडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















