न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च) :- पिंपरीतील खराळवाडी परिसरातील जेष्ठ विधिज्ञ ॲड. जया बाळकृष्ण उभे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा पदमश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा २०१९ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पदमश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान (नेहरु युवा केंद्र क्रिडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार सलग्नित) च्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
”आपण राष्ट्रीय एकात्मता, राजकीय व सामाजीक क्रांतीकारी सेवा ह्या क्षेत्रात सामाजिक सामिलकी व सामाजीक बांधीलकीची जाण व भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य अत्यंत निरलसपणे करीत आहात. ते समाजाला भूषणावह व आदर्श आहे. आपण जोपासलेला सेवाभावी वृत्तीचा समाजसेवेचा, व आदर्श रचनात्मक कार्याचा गौरव व्हावा म्हणून आपली या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार स्फुर्ती देईल”, असे या पुरस्कार पत्रात म्हटले आहे. या पत्रावर पदमश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र भोळे व उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या सह्या आहेत.










