न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर काल मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला.
पिस्तुलाचा धाक दाखवत आणि कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर सात जण फरार आहेत. नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलवर ही घटना घडली असल्याने पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर इतर सात जणांचा पोलीस तपास करीत आहेत.










