न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. २६ मार्च ) :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, डी.पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, शंकरसिंग वाघेला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंढे यांच्यासह आणखी २९ जणांचा समावेश आहे.
काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचाही यादीत समावेश करण्यात आलाय. तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.










