न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि.२६ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर संकलन विभाग सध्या वसुली मोहिमेवर असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. याबाबत कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी माहिती देताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख सहा हजार ९२७ मिळकती आहेत. कोषागरात आजपर्यंत मालमत्ता करातून ४३५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
महापालिकेने जप्तीची कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी. मिळकत भरण्यासाठी महापालिकेने १६ ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे.
निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, महापालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर नागरिकांनी भरावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे.










