न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- बडवे ऑटो कॉम्प्स चाकण एम.आय.डी.सी या कंपनीसोबत ओजेटी ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत वेल्डर, पेंटर जनरल, शीट मेटल वर्कर. या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांचे पालक आणि कंपनी प्रतिनिधी घुले (एच आर एडमिन), जोशी (एचआर एडमिन) यांच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गट निदेशक प्रकाश घोडके, मनोज ढेरंगे निदेशक सतीश गायकवाड, योगेश गरड, गणेश सुर्वे, शहाजी ताटे, भानुदास दुधाळ,विजय भैलुमे,अमित सोलंकी व संदीप राजगुरू हे उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाबाबत माहिती घेतली व संस्था चांगल्या प्रकारे उपक्रम राबवीत असल्याबाबत मत व्यक्त केले. प्राचार्य शशिकांत पाटील यांनी ओजेटी प्रशिक्षणाची मार्गदर्शक तत्वे, महत्व व त्यापासून प्रशिक्षणार्थ्यांना होणारे फायदे याबद्दल माहिती दिली.
या ट्रेनिंग करीता एकूण ६७ प्रशिक्षणार्थी संस्थेमार्फत पाठविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मासिक रुपये ९००० इतके विद्यावेतन देण्यात येणार असून या ट्रेनिंगमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्याच कंपनीत अप्रेंटिसशिप मिळणार आहे.














