- संघटनेच्या अधिकृत वेबसाईटचे आणि सह्याद्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बोधचिन्हाचे अनावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- चाकण MIDC उद्योजक संघटनेचा वर्धापन दिन आणि संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नुकताच उत्साहात साजरा झाला.

याप्रसंगी संघटनेच्या अधिकृत वेबसाईटचे आणि सह्याद्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या उद्योग समूहाच्या नवीन बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
चाकण येथील निघोजे परिसरात वृक्षारोपण, जनकल्याण रक्तपेढी यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यात दोनशेपेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कामगार नेते यशवंत भोसले, अभिजीत प्लास्टिकचे अभिजीत राऊत, बांधकाम व्यवसायिक नामदेव पोटे, इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे रामदास विधाटे, एचए तालीम संघाचे वस्ताद ताराचंद कलापुरे, चाकण MIDC उद्योजक संघटनेचे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी यशवंत भोसले यांनी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. तसेच उपस्थित उद्योजकांना देखील मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे संचालक दत्तात्रय दगडे, उद्योजिका सुनीता गायकवाड, संचालक प्रवीण शिंदे, सचिव श्री निवास माने यांनी देखील मनोगतात संघटनेच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली.
शेवटी जयदेव अक्कलकोटे यांनी सर्वांचे आभार मानले.


















