न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- घरी जात असताना आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात आडवले. फिर्यादीचा मोबाईल हिसकावुन घेतला. फिर्यादीचे खिसे तपासु लागले असता फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला. आरोपीने हातातील लोखंडी वस्तु फिर्यादीच्या डोक्यात मारली. त्यामुळे फिर्यादी खाली पडले. फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येवु लागले. तेवढयात आरोपी यांनी फिर्यादीच्या पॅन्टचे खिशे तपासुन खिशातील १३०० रुपये काढुन घेतले.
हातातील मोबाईल हिसकान घेवु लागले. परंतु, फिर्यादीने मोबाईल हातातुन सोडला नाही. आरडाओरडा केल्याने आरोपी तीथुन पळुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी रात्री १.३० च्या सुमारास गणपती मंदीराजवळ, रामनगर, बोपखेल येथे घडला. फिर्यादी राकेश बाबु तेजी (जेसीबी ऑपरेटर, रा. चऱ्होली) यांनी आरोपी राहुल मदन सोदे, भैया प्रकाश डोंगरे (रा. रामनगर, बोपखेल) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ५३४/२०२३ भादवि कलम ३९४,३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
















