न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- पायी रस्ता क्रॉस करीत असताना निघोजेकडुन येणाऱ्या होंडा दुचाकीवरील चालकाने त्याची गाडी भरधाव वेगात चालवुन फिर्यादीच्या आईला धडक दिली. अपघातामध्ये फिर्यादीच्या ७० वर्षीय आईला डोक्याला व दोन्ही हाताला मार लागून गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आरोपी चालक तिच्या मरणास कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. २५) रोजी सकाळी ७.४५ च्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीतील कान्होकरवस्ती येथील खंडोबा मंदीरा जवळ, मोई ते निघोजे रस्त्यावर घडला.
फिर्यादी संतोष लक्ष्मण गवारी यांनी आरोपी होंडा दुचाकी वरील चालक योगेश गजाननराव मोदी (रा. चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्य विरोधात ३५६ / २०२३ भा.द.वी. कलम २७९, ३३८, ३३७, ३०४ (अ) मो.वा.का. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















